मुंबई : राज्यात सत्तांतरणानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असा राजकीय संघर्ष सुरू झाला. त्यानंतर दोन्ही गटाच्या बाजूंच्या नेत्यांमध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू झाली. यातच आता एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ठाकरे गटाच्या युवा नेत्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या नेत्यांकडून मारहाण करण्यात आली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्र्यांवर जहरी टिका केली. त्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी ठाकरेंना प्रत्त्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“ना पक्षात एकमत, ना महाविकास आघाडीमध्ये, 2024 ला आयेगा तो मोदीही”, भाजपने राष्ट्रवादीला डिवचलं
मुख्यमंत्री असताना कुणालाही जेलमध्ये टाकायचे हे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवताना अटक करून त्यांच्यावर गुन्हाची नोंद होते. हा सत्तेचा माज नव्हता का ? तिरंग्याचा अपमान होत असेल तर मी कानाखाली वाजवली असती हे वाक्य ते बोलले. त्यांनी तसे केलेही नाही. बोलले म्हणून तुम्ही गुन्हा दाखल केला. मग देवेंद्र फडणवीसांना तुम्ही जे शब्द वापरले त्यावरून काय करायचं? राज्य शासनाने अगोदरच्या घटना पाहिल्या तर उद्धव ठाकरेंनाही अटक करावी. असं किरण पावसकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार की थेट लढत ? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
दरम्यान, रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर उद्धव ठाकरे चांगले आक्रमक झालेत. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस म्हणून केला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामाने आलेत. त्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला.
Read also
हेही वाचा…” ते आता काॅंग्रेस नेत्यांना कळून चुकलंय,” भाजप आमदाराने निवडणुकीच्या आधी मीठ चोळलं
हेही वाचा…आघाडीच्या पुण्यातील ‘वज्रमुठ’ सभेचं ठिकाण ठरलं, अजित पवारांकडे जबाबदारी, लाखांच्यावर गर्दी जमणार ?
हेही वाचा…कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुण्यात भाजपची तिरकी चाल, ‘या’ बड्या नावासाठी चाचपणी?
हेही वाचा…अदाणींबाबत केलेल्या शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले की,,,
हेही वाचा…“रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, म्हणाले की,,,,,