पुणे : राज्यात येत्या काही काळात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर सत्ताधारी पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून वज्रमुठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यातच महाविकास आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर याठिकाणी झाली तर दुसरी सभा आता पुण्यात होऊ घातली आहे.
हेही वाचा…“थोडी नैतिकता दाखवून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, सुषमा अंधारेंची मागणी
पुण्यातील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेची जबाबदारी स्वत: अजित पवार यांनी घेतली आहे. त्यासाठी येत्या १४ एप्रिल रोजी ही सभा पुण्यातील नाना पेठेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्याचं ठरवलं आहे. पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेला जवळपास १ लाख लोक जमणार असण्याची शक्यता आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा…“पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं, तेव्हापासून षडयंत्राला सुरूवात झाली”, आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
यातच छत्रपती संभाजीनगर सभेला पाठीत दुखत असल्या कारणाने उद्धव ठाकरे यांना एक वेगळी खुर्ची देण्यात आली होती. ती चुक आता पुण्यातील सभेला टाळणार आहे. त्यामुळे आम्ही सगले एकाच व्यासपीठावर अस असे स्पष्टिकरण राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप व अरविंद शिंदे यांनी दिले आहे. तर त्यानंतरची सभा येत्या १६ एप्रिल रोजी नागपुरात होणार आहे. याची जबाबदारी काॅंग्रेसचे नेते सुनील केदार यांच्याकडे देण्यात आली आहे.
Read also
हेही वाचा…कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुण्यात भाजपची तिरकी चाल, ‘या’ बड्या नावासाठी चाचपणी?
हेही वाचा…अदाणींबाबत केलेल्या शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले की,,,
हेही वाचा…“रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, म्हणाले की,,,,,
हेही वाचा…“ना पक्षात एकमत, ना महाविकास आघाडीमध्ये, 2024 ला आयेगा तो मोदीही”, भाजपने राष्ट्रवादीला डिवचलं
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार की थेट लढत ? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं