IMPIMP
Sharad Pawar group's strong reply to Ajit Pawar's letter Sharad Pawar group's strong reply to Ajit Pawar's letter

सरकारमध्ये १०० दिवस झाल्याने अजित पवारांचं पत्र, शरद पवार गटाने साधला जोरदार निशाणा, म्हणाले,..

पुणे : राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवारांनी सरकारमधील सामील होण्याला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यासंदर्भात अजित पवारांनी एक पत्र लिहिलं असून स्वत: चा उल्लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून केला आहे. या पत्रात कुठेही शरद पवारांचा उल्लेख नसून महायुतीच्या सरकारमध्ये सामील होण्याच्या पार्श्वभूमीवर जनतेला अजित पवारांनी पत्र लिहिलं आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले शाहू- आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे. माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे. असं अजित पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्यावर आता शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

हेही वाचा…“तेव्हा पंकजाताई अनेकवेळा पवारसाहेबांना भेटायला यायची”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान 

१०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण ठेवला आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम केले आहे.१०० दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे काम केले आहे. वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबत, १०० दिवस रूग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार अंसवेदनशील सरकारसोबतचे असा पलटवार शरद पवार गटांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा…चर्चेत असलेले गोगावले मंत्रीपद सोडून शिंदेंना साथ का देताहेत ? गोगावलेंनीच सांगितलं कारण 

१०० दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार, प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्राविरोधांसोबत, माताभगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्यकारभार चालवण्याचे, मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत, समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षणविरोधांकसोबतचे, मराठी आस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्रांद्रोह्यांसोबतचे, कर्तृत्व सांगावं यातच तुमच्या चूकीच्या निर्णयाबद्दली मनातील खंत लख्ख दिसून येत आहे. असा टोलाही शरद पवार गटाने चढवला आहे.

हेही वाचा…महाराष्ट्राच्या तळागाळातून ठाकरेंना पाठिंबा, मातोश्रीवर हजारो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन 

दरम्यान, पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्त्यापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही, जो तुम्ही गेले १०० दिवस गहाण ठेवलात. कितीही मोठं संकट आलं तरी, विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेतृत्व शरद पवारांच्या मध्येच आहे. असंही शरद पवार गटांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा…पार्थ पवारांना राजकारणात आणण्यासाठी अजित पवारांनी दिला राजीनामा ? नेमकं काय घडलं? 

हेही वाचा…“आम्ही ठरवले असते तर शिवतीर्थावर सभा घेतलीही असती, पण..,”दसरा मेळाव्यावरून शिंदेंनी घेतली माघार

हेही वाचा…आमदार अपात्रतेची सुनावणी एक दिवस आधीच होणार, मोठं कारण आलं समोर 

हेही वाचा…“तेव्हा महाराष्ट्रात दोनच नेत्यांनी काॅंग्रेसच्या विरोधात रान पेटवलं होतं”, सुळेंचा भाजपवर हल्लाबोल 

हेही वाचा…“धंगेकरांचा पारा चढला..! अन् थेट ससून रूग्णालय गाठून ‘या’ प्रकरणाबाबत ससून रूग्णालय प्रशासनाला धरले धारेवर