मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा होत आहे. शिवाजी पार्कवर राज ठाकरे काय बोलणार याची कार्यकर्त्यांना उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यातच अवघ्या काही तासात सुरू होणाऱ्या सभेसाठी लोकांची गर्दी शिवतीर्थावर जमायला सुरूवात झाली आहे. यातच राज्यात आता राज ठाकरे आपल्या जाहीर सभेतून कुणाचा समाचार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…““मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान”,आव्हाडांचा राज ठाकरेंच्या पोस्टरवरून टोला
मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचे विचार आणि वारसा दोन्ही बाळासाहेबांचा वारसा आहे. इतरांना विचार आणि वारसा सोडलं आहे. परंतु राज ठाकरे बाळासाहेबांचा विचार आणि वारसा चालवत आहे. आम्ही हाच संकल्प करणार की आमच्या जास्त जागा निवडून आल्या पाहिजे. तसेच सगळे भोंगे अद्याप उतरले नाहीत. १० टक्के बाकी आहेत. यावर आज राज ठाकरे बोलतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे हे केवळ खुर्च्याचे मुख्यमंत्री”, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टिका
यातच राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांतून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आज बघायला मिळणार आहेत. यातच पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
Read also
- हेही वाचा…राज ठाकरेंची भाषणही बाळासाहेबांसारखी असतात, सगळ्यांना भाषणाची उत्सुकता
- हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..
- हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया
- हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”
- हेही वाचा…“मग अमृता वहिनीच्या प्रकरणात देणाराच कसा दोषी ?” त्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचा सवाल