IMPIMP
Ambadas Danve's reaction to the Ayodhya Paul assault case Ambadas Danve's reaction to the Ayodhya Paul assault case

“एकटीला घेऊन २०० जणांनी मारलं, तिथे आमचे ५० जरी असते तर पुरून उरले असते”

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया महाराष्ट्र समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शुक्रवारी कळव्यात भ्डाय हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर त्यांच्यावर काही महिलांनी शाईफेक करत मारहाणही केली आहे. हा प्रकार शिंदे गटातील नेत्यांची केल्याचा ठाकरे गटाकडून आरोप करण्यात येत आहे. आता या प्रकरणात शिंदे गटाची काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यातच या प्रकरणाबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसातून मोदी साहेबांचं १० तर फडणवीसांचं पाच ते सहा वेळा नावं घेतात”, दिपक केसरकर 

कळव्यात अयोध्या पौळ यांना मारहाण केल्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेंवर हल्ला चढवला आहे. अयोध्या पौळ यांना मारहाण हे नामर्दनगीचं लक्षण आहे. अयोध्या पौळ ही आणखी त्वेषाने लढेल. एकटीला घेऊन २०० जणांनी मारलं आहे. तिथे आमचे ५० जरी असते तर पुरून उरले असते. असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा…“फडणवीसांच्या दौऱ्यात “भकास @ 40″ लागले,” बॅनर्स, भाजप शिंदेंना डिवचलं 

कळवा येथील मनिषा नगरातील भीम नगर येथे अहिल्यादेवी होळकर जंयती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम ठाकरे गटाचा असल्याचं सांगून शिंदे गटातील नेत्यांनी अयोध्या पौळ यांना ट्रॅप करून बोलवण्यात आलं. या कार्यक्रमात महापुरूषांना अभिवादन करत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शेवटी हार का घातला? यावरून काही महिला स्टेजवर आल्या अन् अयोध्या पौळ यांच्या तोंडाला शाई लावली. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद सोडवला. परंतु या कार्यक्रमातून जात असतांना एका महिलेने अयोध्या पौळ यांना मारहाण केली. असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा…“अजून दोन म्हणजे चार मुलं हवीत,” सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आता चित्रा वाघ यांचा टोला 

मी अन् माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन् माझ्या देशाचे संविधान कोणावरही हाच उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते. असलेले हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन् मी ती लढेल. आज माझा शिवसेना पक्ष, माझे नेते उपनेते आमदार अन् लाखो शिवसैनिक माझ्यासोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली. घडलेला सर्व प्रकार लवकरच सांगेन असं अयोध्या पौळ यांनी म्हटले आहे.

READ ALSO :

हेही वाचा…आशिष देशमुखांचा वापर ‘भाजप’ योग्यपद्धतीने करणार, काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या विरोधात उतरवणार 

हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर राज्यात मोठ्या प्रमाणात हाणामाऱ्या होतील “,बड्या आमदाराचं सुचक वक्तव्य 

हेही वाचा…“नगरमधील उपाध्यक्षांनी राष्ट्रवादीला ठोकला राम राम, दुय्यम वागणुक मिळत असल्याचं सांगत BRS मध्ये प्रवेश 

हेही वाचा…शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला, ठाकरे गटाचा शिंदे गटावर आरोप 

हेही वाचा…*मुख्यमंत्री शिंदेंनी वाढवलं राष्ट्रवादीच टेन्शन? थेट पोहचले कट्टर अजितदादा समर्थक आमदाराच्या कार्यालयात,*