IMPIMP
Devendra Fadnavis is very angry about women, amazing statement of BJP MLA Devendra Fadnavis is very angry about women, amazing statement of BJP MLA

देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा, भाजप आमदाराचं गजब विधान

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आली आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळत आहेत. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना भाजप आमदारांनी गजब विधान केलं आहे. त्यांचं वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. टिव्ही९ ने याची बातमी दिली आहे.

हेही वाचा…“तुमच्यात खरंच ताकद असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा”, अजित पवारांचंं भाजपला आवाहन 

सोलापुर शहरातील प्रभाग क्रमांक २६ मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उद्घाटन सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलतांना म्हणाले की, यावर्षीचा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झाले आहेत. मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण, लग्नापर्यंतची काळजी घेतली जात आहे. राज्यातील मुलींची चिंता आता फडणवीस करणार आहेत. असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

हेही वाचा…“अमित शहांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो, मग भाजप मिंधेंचे काय चाटतय ?” उद्धव ठाकरेंचा घणाघात 

दरम्यान, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा यावर्षी पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. त्याबाबत बोलतांना देशमुख यांनी फडणवीसांचं कौतुक करतांना वक्तव्य केलं आहे.

Read also

हेही वाचा…डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे, 1992 साली डेव्हलप झालेला फॉंन्ट 1983 च्या सर्टिफिकेवर कसा ? 

हेही वाचा…“रिक्षावाल्याच्या हाताखाली काम कसं करणार ? मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना शरद पवार साहेबांनीच गळ घातली”

हेही वाचा…“आता भाईजान उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टिका करण्याची लायकी राहिली नाही”, नवनीत राणा 

हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील”, शिवसेना आमदाराचा मोठा दावा 

हेही वाचा” आता भाजप नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल