सातारा : राज्यात सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटातील मंत्री, आमदार कार्यकर्ते सातत्याने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर विरोधकांकडून प्रखर शब्दात टिका करण्यात येत आहे. यातच शिंदे गटातील आमदार राजेश क्षीरसागर अशाच एका कारणांमुळे चर्चेत आले आहेत.
हेही वाचा…दादा भुसेंनी राऊतांना चॅंलेज दिलं, त्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..”पुन्हा निवडून येऊन..”
सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विकासकामे तसेच जिल्ह्याच्या आगामी नियोजन समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत राजेश क्षीरसागर जिल्हाधाकारी रूचेश जयवंशी यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. तसेच खुर्ची पळवणे यात शिंदे गटाचा हात कोणी पकडू शकत नाही. असं म्हणत त्यांनी राजेश क्षीरसागर यांना टोला हाणला आहे.
हेही वाचा…“आरोप सिद्ध झाले तर राजीनामा देईन, खोटे निघाले तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा”,दादा भुसे
सुरज चव्हाण यांनी राजेश क्षीरसागर यांचे काही फोटो ट्विट करत निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, राजेश क्षीरसागर हे शिवसेना नेते आहेत. ते सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले आहेत. दुसऱ्याच्या खुर्चीवर बसने किंवा खुर्ची पळवणे यात शिंदे गटाचा हात कोणी पकडू शकत नाही. असा टोला सुरज चव्हाण यांनी हाणला आहे.
हेही वाचा…““संजय राऊत ‘मातोश्रीची’ भाकरी खाऊन ‘पवारांची’ चाकरी करतात” दादा भुसेंच्या वक्तव्यावरून सभागृहात मोठा गोंधळ
दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनी बोलवलेल्या बैठकीत सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सातारा प्रभारी मुख्य कार्यकारी, अधिकारी महादेव घुले, सातारा निवासी उपजिल्हाधिकारी, प्रशांत आवटे, सातारा जिल्हा नियोजन अधिकारी, शशिकांत माळी,खंडाळा तालुका तहसीलदार, दशरथ काळे,शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख, पुरुषोत्तम जाधव, रिपाई चे प. महाराष्ट्र कार्याध्यक्ष, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.
राजेश क्षीरसागर हे शिवसेना (शिंदेगट) चे नेते आहेत ते सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले आहेत.
दुसऱ्याच्या खुर्चीवर बसने किंवा खुर्ची पळवणे यात शिंदे गटाचा हात कोणी पकडू शकत नाही. pic.twitter.com/QTVbLYJ4iQ— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) March 21, 2023
Read also
- हेही वाचा…“विधिमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांवर कारवाई होणार”, राहुल नार्वेकरांचा सुचक इशारा
- हेही वाचा…गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा
- हेही वाचा…“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री”, दादरमध्ये राज ठाकरेंचे लागले बॅनर्स, चर्चांना उधाण
- हेही वाचा…“राऊत आम्हाला ‘डुक्कर’, ‘गटाराचं पाणी’ असे बोलतात” शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, दादा भुसे प्रकरण तापलं
- हेही वाचा…“आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं, अध्यक्षांची मस्करी, फडणवीसांची फिरकी, सभागृहात एकच हास्यकल्लोळ