IMPIMP
Uddhav Thackeray was beaten by Sharad Pawar for the post of Chief Minister Uddhav Thackeray was beaten by Sharad Pawar for the post of Chief Minister

“रिक्षावाल्याच्या हाताखाली काम कसं करणार ? मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना शरद पवार साहेबांनीच गळ घातली”

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलचं तापू लागलं आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून सभांचं आयोजन केलं जात आहे. यातच काल महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे वज्रमुठ सभा पार पडली. या सभेत आघाडीतील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर हल्ला चढवला. यातच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी एक महत्वाचं भाष्य केलं आहे.

हेही वाचा…“दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाईल नंबर कसा मिळाला?” सुनील राऊतांचा फडणवीसांना सवाल 

शरद पवार म्हणाले की, आमच्या काॅंग्रेसमध्ये दोन दोन मुख्यमंत्री आहेत. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत. राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेते आहेत. यामध्ये छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील आहेत. मग त्या रिक्षावाल्याच्या हातात काम करणार का ? तरीही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव दिलं होतं. त्यानंतर शरद पवार साहेबांनी गळ घातली होती की, हे शिवधनुष्य तुम्हालाच पेलावं लागणार आहे. असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा…“नजर सुधारा ताई आता स्वत:ची… ! चित्रा वाघ यांचा सुळेंवर हल्लाबोल,” वांग्यांचं चित्र ही टॅग केलं 

दरम्यान, काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत महाविकास आघाडीचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. त्यांनी भाजप आणि शिंदेंवर यावेळी जोरदार टिका केली. त्यामुळे आज राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं असून भाजपकडून देखील यावर आता पलटवार केला जात आहे.

Read also

हेही वाचा…“आता भाईजान उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टिका करण्याची लायकी राहिली नाही”, नवनीत राणा 

हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील”, शिवसेना आमदाराचा मोठा दावा 

हेही वाचा” आता भाजप नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 

हेही वाचा…“तुमच्यात खरंच ताकद असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा”, अजित पवारांचंं भाजपला आवाहन 

हेही वाचा…“अमित शहांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो, मग भाजप मिंधेंचे काय चाटतय ?” उद्धव ठाकरेंचा घणाघात