IMPIMP
mahavikas aghadi mahavikas aghadi

अंबादास दानवेंचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जाणार, ठाकरेंना आता राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस धक्का देणार ?

मुंबई : ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आक्रमक आमदार मनिषा कायंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. याचा मोठा धक्का माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसला आहे. यातच आता मनिषा कायंदे यांच्या जाण्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही ठाकरेंकडून जाणार असून यासाठी आता राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील सुचक विधान केले आहे.

हेही वाचा…“कोणाच्या बापाचा बाप जरी जमिनीवर उतरला तरी…,” देवेंद्र फडणवीसांनी दिला विरोधकांना इशारा 

सध्या विधानपरिषदेत भाजपचे १९ तर राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रत्येकी १२ आमदार आहेत. मात्र आता मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरेंकडे ११ आमदार शिल्लक राहिले आहेत. यातच आता सर्वात जास्त ज्यांचे आमदार त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद असा महाविकास आघाडीत ठरलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून हे पद राष्ट्रवादी किंवा काॅंग्रेसकडे जाणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचे तिखट वार, देवेंद्र फडणवीसांचे पलटवार,” ठाकरे अन् फडणवीसांमुळे राजकारण तापलं 

विधानसभेचे ज्यावेळी हरिभाऊ बागडे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळणार. परंतु सध्यातरी त्याचा विचार आम्ही केला नाही. परंतु पक्षांची बैठकीत हा विषय चर्चेला घेतला जाईल. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा…“भाजपच्या नेत्या, ते शिवसेनेच्या आक्रमक आमदार,” वाचा मनिषा कायंदेंचा राजकीय प्रवास 

यातच आता शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहे. या बैठकीत आता याबाबत देखील चर्चा केली जाणार का? अशी शक्यता देखील आता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरेंकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते गेले, तर राष्ट्रवादीकडून आमदार एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिलं जाणार आहे? अशीही चर्चा दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळात चर्चेली जात आहे.

READ ALSO :

हेही वाचा…राज्यात आता निवडणुका झाल्या तर कोण मुख्यमंत्री, कुणाची सत्ता ? एका सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर 

हेही वाचा…“उद्धव साहेब, तुम्ही फक्त संजय राऊतांना बाजूला करा, तीच शिवसेना उभी करू” 

हेही वाचा…ठाकरेंना धक्का देत विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर NCP अन् काॅंग्रेसमध्ये चुरस, तातडीची बैठक बोलवली 

हेही वाचा…बीआरएसची महाराष्ट्रात “हायटेक” रणनीती, सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचला BRS पक्ष 

हेही वाचा…शिंदेंच्या बंडला एक वर्ष पुर्ण, ‘NCP’ गद्दार दिवस आंदोलन साजरा करणार, घोषणांही ठरल्या